Monday, January 16, 2012


The scattered strands of memories
Is all that remains today of the beach
Relations as porous as the sands
Leave no traces of the love
That flowed over it as freely as water.
I too, as a mute spectator, allow the salt of my tears
To challenge the salinity of the sea
And a like a true lover of the beach
Leave behind footprints and sand castles of memory
For others to marvel at their beauty
Till the changing face of time, like the sea,
Sweeps all away forever.

Tuesday, January 10, 2012

एक वेगळंच नातं



अमू नेहमीसारखाच ट्राफिक मधून भरधाव वेगाने गाडी चालवून rally मध्ये असल्याचा जणू आनंद घेत होता व काही करायला नसल्यामुळे मी ट्राफिककडे अलिप्त पाने बघत विचारात बुडून गेले होते. नाहीतरी मला सवयच होती माझ्या आवडत्या विषयात हरवून जायची: मनुष्य स्वभाव आणि नाती. हा विषय असा होता कि कधीही, केवढेही, कोणीही त्याच्यावर विचार करू शकत होतं......उत्तरं.....ती तर मिळणं केवळ अशक्य होतं.

हल्ली नेहमीच विचार करताना एक विचार्धारिणी मला सतवायची....नाती कश्या वरून ठरतात आणि ती बदलत जातात ह्याची कल्पना असली तरीही आपण त्यात का गुंतत जातो.....हळू हळू माझ्या लक्ष्यात आलं होतं कि हे एक न बदलणारं सत्य आहे व त्या मुले त्या क्षणांचा आनंद घेणं हे केवळ शहाणपणाचं लक्षण असतं.

आणि एक असं निरागस आणि सुंदर नातं होतं ते अमू (मैथिलीच्या आईचा मानलेला भाऊ) व मैथिलीच. ते एकामेकान  बरोबर इतके परिपूर्ण वाटायचे कि बघणारा देखील स्वतःला त्या नात्यात हरवून जायचा. खरं तर मामा भाची हे एक गाज्लेलच नातं होतं....मामाच्या गावाला जाऊया ह्या गाण्यापासून बर्याच टिपण्या त्यावर झाल्या होत्या अ त्या गाज्ल्यादेखील होत्या. मामा हा भाचीला चीडव्णारच व ती त्याच्याकडे हक्काने हट्ट करू शकणारच हे जणू त्या नात्यात अध्यारुतच होते, पण ह्या दोघांच काही तरी वेगळंच होतं......

'बाबा' ने सुरु करणारी मैथिली आता बर्याच काळा पासून त्याला मामा म्हणू लागली होती. आता तो माखता तिच्या लहान बहिणी (गार्गी) ने उचलला होता, पण अजूनही कधीतरी खेळात गुंग असताना तिच्या तोंडून 'बाबा' ऐकू यायचं आणि तो हि तीत्याच सहजपणे तिला उत्तर द्यायचा.

मी त्याच्याकडे अचानकच वळून म्हंटल अरे मैथिलीला खात्री पटत चालली आहे तुला काही येत नाही ह्याची. बर्याच काळा पासून ते दोघं दोन खेळात पार रंगून जायचे. तासंतास त्यांचा तो खेळ बघून मला देखील मजा वाटायची. मैथिलीला lipstick ला listip म्हणायची सवय होती. तो उच्चार तिच्या तोंडून इतका गोड वाटायचा कि आम्ही कारण शोधून तिला तो शब्द म्हणायला लावायचो. पण अमुचा त्यावरचा तोडगा सोपा होता तिने लीस्तीप म्हणताच तो त्याचा अजून अपभ्रौंश करायचा....कधी plastic तर कधी lispit ..... आणि हे उच्चार दर वेळेस बदलत रहायचे, स्वतः तो शब्द बोबडा बोलणारी मैथिली exasperate व्हायची, तिच्या चेहऱ्यावरचे बदलायचे व ती त्याला समजवायचा प्रयत्न करायची, 'अरे मामा lispit नाही listip ...... आणि परत एक चिकीचा उच्चार....

मैथिलेने ठरवल होतं कि मलाच तिची व्यथा समजू शकेल. लगेच ती माझ्याकडे वळून म्हणायची, 'बघ न ग आजी, तो listip ला lispit म्हणतोय...असा खेळ ते दोघं तासंतास खेळायचे. मैथिली मला एक समदुखी  समजून तो काय म्हणतो आहे ते जणू माझ्या कानात पडलं नाही आहे तसं तो repeat करायची आणि बघता बघता ट्राफिक मध्ये आपण अडकलो आहे हे न कळता आम्ही केव्हाच घरी पोहोचायचो.

हे चालू असतानाच शाळेत मिठीच्या टिचरने  एक नवीन गाणं शिकवलं....'एवढीशी कोथांबीर मिरची आलं, त्या तिघांचं भांडण झालं'. आता ती ते अमू मामा ला गाडीत शिकवू लागली होती. तोही तेवढ्याच उत्साहाने ते शिकायचा व तिच्या पाठोपाठ म्हणायचा...'एवढीशी कोथांबीर मिरची आलं, त्या चौघांचं भांडण झालं'......परत त्या चिमुकल्या जीवाचा तेवढाच त्रागा....'अरे नाही रे मामा, चौघं नाही तिघं...चौघं कसं होणार?'...आणि त्याचं प्रोम्प्त उत्तर 'बघ 'एवढीशी', 'कोथांबीर', 'मिरची', 'आलं', चार झाले कि नाहीत?'

परत चेहऱ्यावर तोच प्रश्न व त्याला उत्तर, 'अरे मामा एवढीशी म्हणजे काहीच नसतं' व एखाद्या umpire सारखं माझाकडे appeal .... 'हो कि नाही ग आजी, एवढीशी म्हणजे काहीच नसतं ना?' आणि माझा केवळ हसू त्यांचा तो खेळ आणि त्यात रमण बघून.

गाडी आता अमुने स्लो केली होती आणि आम्ही दोघ तय आठवणीत बुडून हसत होतो....परत मी म्हणाले, 'अरे मैथिलीला वाटत तुला काहीच येत नाही', आणि तो एक ऑटो journalist तेवढ्याच सहजपणे मला म्हणाला हो ना तिला वाटत मी शाळेतहि गेलो  नाही.....नुसत्या म्हशी हाकल्या आहेत लहानपणापासून.' त्याचे डोळे लुकलुकत होते आणि त्या त्याच्या आनंदात मला लक्ष्यात आलं, माझे विचार केवढे उच्छृंखल होते ते मला नेहमी वाटायचा ......तिला काय वाटेल आपला मामा केवढा बुद्धू आहे .....आणि तिला तसं वाटता नये .......मी अडकले होते समाजाने बंधेलेल्या चक्रात ..... कि दुसऱ्याला आपल्याबद्दल चांगलंच वाटलं पाहिजे नाहीतर आपलं त्यांच्या मनात impression काय होईल.

त्या दोघांनी मुक्त केलं होतं मला ह्या चक्रातून आणि शिकवलं होतं मला खरं प्रेम म्हणजे मजा करणं असतं, सहवासाचा आनंद घेणं असतं, सहवासाचा आनंद घेणं असतं ....... त्यातून पुढे काय होईल?.....काय फरक पडतो त्याने. शेवटी काय, हातात असलेले क्षणच महत्वाचा असतो.                 
 

Monday, January 9, 2012

एका तरुण आजीचं चरित्र

आजी होणं हे सोपं काम नसतं. खरं तर आजी हा शब्द ऐकताच आपल्या समोर प्रतिमा येते ती एका वयस्क बाईची, जिच्या हातात जरीही काठी नसली, तरीही तिचे केस पांढरे झालेले असतील आणि थोडे का होईना दात पडलेले असतील. म्हणूनच वयाच्या छातीसाव्या वर्षी जेव्हा मी ऑफिसमधल्या सहकार्यांना सांगितलं कि मी आजी झाले आहे, तेव्हा त्यांना ते काही पटेना, पण तरीही मी परिपूर्ण तयार होते आजी बनायला.

एका modern आजी सारखी मी हातात स्वतः iron on patch लाऊन तयार केलेली गोधडी, काही नवीन कपडे आणि एक सोन्याची चेन/साखळी घेऊन हॉस्पिटलला निघाले. पण तिथे जाताच जेव्हा मला एक चिमुकला जीव (निव्वळ दोन दिवसांचा) पाळण्यात झोपलेला दिसला, तेव्हा मात्र माझे हात कापू लागले आणि मला प्रश्न पडला - काय मी ह्या चिमुकल्या जीवाला उचलू शकेन, काय मला सांभाळणे जमेल, काय मी तय लहान जीवाच्या वाढत्या इच्छा आणि आकांशाना सामोरं जाऊ शकेन? अश्या विचारात पार हरवून गेले असताना माझ्या अचानक लक्ष्यात आले कि माझ्या समोर माझी ताई उभी आहे आणि ती माझ्या पुढे त्या चिमुकल्या जीवाला करून वात बघते आहे, मी तिला घ्यायची.

त्या बाळाला हातात घेतले आणि क्षणात माझ्या आयुष्यातील एक नवे पर्व सुरु झाले. एक तरुण आजी म्हणून माझ्यावर असणारी जबाबदारी नक्कीच जास्त होती. कसं सांगू शकणार मी त्या वाढत्या बाळाला कि आता मी म्हातारी झाले .....मला हे जमणार नाही....आणि असेच काहीसे निश्चयाने आणि काहीसे अनपेक्षितपणे मी माझे आजीपण स्वीकारले.

समुद्राकाठी बसून वाळूत डोंगर करायचे, पाण्यात भिजून ओल्या कपड्यांनी यायचे हे हळू हळू बर्याच काळानंतर अंगवळणी पडू लागले होते. आणि नाही, आजीपण तितकं काही कठीण नाही असे आता वाटू लागले होते आणि तितक्यातच असे काही दोन तीन अनुभव आले कि काय बोलावं त्याबद्दल. तोपर्यंत आजी म्हणजे mobile phone वर videos घेणे आणि नातीशी खेळणे इतकंच होतं, पण बघता बघता ती एका वर्षाची झाली आणि एक दिवस तिचा मामा तिला उंच हवेत उडवून पकडू लागला....आणि इतर वेळा कणखर असलेली मी एकदम थबकले व त्याला काहीसे जोर्यातच म्हंटले, 'अरे, पडेल ना ती.....'. त्या दोघांच्या हसण्यात माझा आवाज केव्हाच विरून गेला...मैथिलीचा मामा थांबला आणि अचानक म्हणाला, 'म्हाताऱ्या झालाय तुम्ही. कश्याला घाबरता, मी आहेना इकडे, आणि तिला बघा केवढी मजा येते आहे ते'. तेव्हा पहिल्यांदा आजीच्या 'आजीपणाचा' मला भास झाला व पुढे जेव्हा ती घसरगुंडी वरून फास्ट घसरू लागली, जंगलजीम्वर चढू लागली, मोठा झोका घेऊ लागली, तेव्हा माझे हात फक्त पडली तर धरायला आणि नाहीतर जादू करून भू घालवायला पुढे होऊ लागले.
 
पण तरी पुढे काय जाहले ते अनपेक्षितच होते. एक दिवा मैथिलीला ट्री हाउस वर चढायची हुक्की आली  आणि मामा हि बरोबर नव्हता.....तेव्हा तिच्या मनात भीती बसू नये म्हणून कापर्या मानाने आणि स्थिर हाताने मी तिला, मला वाटत असलेल्या भीतीचा आभास नं होऊ देता, वर घेऊन गेले आणि तसेच काळीही आणले. त्या नंतर झालेल्या आणि दोन नातवंडांनी माझी, ते बरोबर असताना तरी, कुत्र्याची भीती मनात दाबायला मला शिकवले.

आणि हळू हळू माझ्या लक्षात आले कि आजीपण म्हणजे मुलांना त्यांना आवडत ते त्यांच्या बरोबर करण्यात असत, त्याला काही वयाचं भान नसतं, आजीपण हे नातवंडांसाठी special बनण असतं, व असं लक्ष्यात येत मला आठवली ती माझी आजी, जी १९७० मध्ये मी एक बाळ असल्यापासून मला खूप गाणी म्हणून दाखवायची, shakespeare चे उतारे च्या उतारे म्हणायची आणि १०८ गोष्टी सांगायची व असं नकळतच तिने माझ्या आयुष्याला इंग्रजी साहित्याची प्राध्यापिका होण्याकडे वळण दिलं होतं; व माझी दुसरी आजी जिला वाटायचं कि तिच्या मुलीला (अर्थात माझ्या आईला) थोड्या जास्त वेळ माहेरी बसता यावं, ती मी घरी जाण्याची भुण भुण लाऊ लागले कि माझ्या आवडीच्या हिरव्या (काजूच्या) वाड्या देऊन म्हणायची, 'ह्या संपव, मग घरीच तर जायचं आहे ना?'

अश्या सासू आणि आईच्या छत्रछायेत राहिलेले माझी आई देखील एक आदर्श आजी आहे. अजूनही (वय वर्षे ८० ओलांडून गेली असून व तब्यतीच्या अनेक तक्रारी असूनही) ती त्याच प्रेमाने तिच्या नातवंडांच्या आवडीचे खाण्याचे पदार्थ करू शकते, नातीचं बाळंतपण काढू शकते, पणत्यांना सांभाळू शकते, त्यांच्या आईला आणि आजीला विश्रांती मिळावी म्हणून आणि 'ये नुम्बेर मजदूद नाही है' असे नकळत विनोद करून, आपल्या नातवंडांच्या मनात घर करून 'पॉपुलर' आजी होऊ शकते.

माझीही इच्छा आहे अशी आजी बनायची, जिला नातवंड हक्काने विचारू शकतात 'आजी, माझं गिफ्ट कुठे आहे, जिच्या attention साठी ते भांडू शकतात, जिच्याकडे दर सुट्टीत त्यांना यायचं  असत आणि जी आपल्या घरी गेल्यावर तिला ते शोधतात.

आणि म्हणूनच जेव्हा माझं भाऊ मला म्हणाला 'तू निघताना तू व आपल्या नाती कसे रडता ते मला बघायचं आहे', तेव्हा मी त्याल एवढाच म्हंटल, 'अरे, अस निरागस प्रेम मिळायला देखील नशीब लागतं.