आजी होणं हे सोपं काम नसतं. खरं तर आजी हा शब्द ऐकताच आपल्या समोर प्रतिमा येते ती एका वयस्क बाईची, जिच्या हातात जरीही काठी नसली, तरीही तिचे केस पांढरे झालेले असतील आणि थोडे का होईना दात पडलेले असतील. म्हणूनच वयाच्या छातीसाव्या वर्षी जेव्हा मी ऑफिसमधल्या सहकार्यांना सांगितलं कि मी आजी झाले आहे, तेव्हा त्यांना ते काही पटेना, पण तरीही मी परिपूर्ण तयार होते आजी बनायला.
एका modern आजी सारखी मी हातात स्वतः iron on patch लाऊन तयार केलेली गोधडी, काही नवीन कपडे आणि एक सोन्याची चेन/साखळी घेऊन हॉस्पिटलला निघाले. पण तिथे जाताच जेव्हा मला एक चिमुकला जीव (निव्वळ दोन दिवसांचा) पाळण्यात झोपलेला दिसला, तेव्हा मात्र माझे हात कापू लागले आणि मला प्रश्न पडला - काय मी ह्या चिमुकल्या जीवाला उचलू शकेन, काय मला सांभाळणे जमेल, काय मी तय लहान जीवाच्या वाढत्या इच्छा आणि आकांशाना सामोरं जाऊ शकेन? अश्या विचारात पार हरवून गेले असताना माझ्या अचानक लक्ष्यात आले कि माझ्या समोर माझी ताई उभी आहे आणि ती माझ्या पुढे त्या चिमुकल्या जीवाला करून वात बघते आहे, मी तिला घ्यायची.
त्या बाळाला हातात घेतले आणि क्षणात माझ्या आयुष्यातील एक नवे पर्व सुरु झाले. एक तरुण आजी म्हणून माझ्यावर असणारी जबाबदारी नक्कीच जास्त होती. कसं सांगू शकणार मी त्या वाढत्या बाळाला कि आता मी म्हातारी झाले .....मला हे जमणार नाही....आणि असेच काहीसे निश्चयाने आणि काहीसे अनपेक्षितपणे मी माझे आजीपण स्वीकारले.
समुद्राकाठी बसून वाळूत डोंगर करायचे, पाण्यात भिजून ओल्या कपड्यांनी यायचे हे हळू हळू बर्याच काळानंतर अंगवळणी पडू लागले होते. आणि नाही, आजीपण तितकं काही कठीण नाही असे आता वाटू लागले होते आणि तितक्यातच असे काही दोन तीन अनुभव आले कि काय बोलावं त्याबद्दल. तोपर्यंत आजी म्हणजे mobile phone वर videos घेणे आणि नातीशी खेळणे इतकंच होतं, पण बघता बघता ती एका वर्षाची झाली आणि एक दिवस तिचा मामा तिला उंच हवेत उडवून पकडू लागला....आणि इतर वेळा कणखर असलेली मी एकदम थबकले व त्याला काहीसे जोर्यातच म्हंटले, 'अरे, पडेल ना ती.....'. त्या दोघांच्या हसण्यात माझा आवाज केव्हाच विरून गेला...मैथिलीचा मामा थांबला आणि अचानक म्हणाला, 'म्हाताऱ्या झालाय तुम्ही. कश्याला घाबरता, मी आहेना इकडे, आणि तिला बघा केवढी मजा येते आहे ते'. तेव्हा पहिल्यांदा आजीच्या 'आजीपणाचा' मला भास झाला व पुढे जेव्हा ती घसरगुंडी वरून फास्ट घसरू लागली, जंगलजीम्वर चढू लागली, मोठा झोका घेऊ लागली, तेव्हा माझे हात फक्त पडली तर धरायला आणि नाहीतर जादू करून भू घालवायला पुढे होऊ लागले.
पण तरी पुढे काय जाहले ते अनपेक्षितच होते. एक दिवा मैथिलीला ट्री हाउस वर चढायची हुक्की आली आणि मामा हि बरोबर नव्हता.....तेव्हा तिच्या मनात भीती बसू नये म्हणून कापर्या मानाने आणि स्थिर हाताने मी तिला, मला वाटत असलेल्या भीतीचा आभास नं होऊ देता, वर घेऊन गेले आणि तसेच काळीही आणले. त्या नंतर झालेल्या आणि दोन नातवंडांनी माझी, ते बरोबर असताना तरी, कुत्र्याची भीती मनात दाबायला मला शिकवले.
आणि हळू हळू माझ्या लक्षात आले कि आजीपण म्हणजे मुलांना त्यांना आवडत ते त्यांच्या बरोबर करण्यात असत, त्याला काही वयाचं भान नसतं, आजीपण हे नातवंडांसाठी special बनण असतं, व असं लक्ष्यात येत मला आठवली ती माझी आजी, जी १९७० मध्ये मी एक बाळ असल्यापासून मला खूप गाणी म्हणून दाखवायची, shakespeare चे उतारे च्या उतारे म्हणायची आणि १०८ गोष्टी सांगायची व असं नकळतच तिने माझ्या आयुष्याला इंग्रजी साहित्याची प्राध्यापिका होण्याकडे वळण दिलं होतं; व माझी दुसरी आजी जिला वाटायचं कि तिच्या मुलीला (अर्थात माझ्या आईला) थोड्या जास्त वेळ माहेरी बसता यावं, ती मी घरी जाण्याची भुण भुण लाऊ लागले कि माझ्या आवडीच्या हिरव्या (काजूच्या) वाड्या देऊन म्हणायची, 'ह्या संपव, मग घरीच तर जायचं आहे ना?'
अश्या सासू आणि आईच्या छत्रछायेत राहिलेले माझी आई देखील एक आदर्श आजी आहे. अजूनही (वय वर्षे ८० ओलांडून गेली असून व तब्यतीच्या अनेक तक्रारी असूनही) ती त्याच प्रेमाने तिच्या नातवंडांच्या आवडीचे खाण्याचे पदार्थ करू शकते, नातीचं बाळंतपण काढू शकते, पणत्यांना सांभाळू शकते, त्यांच्या आईला आणि आजीला विश्रांती मिळावी म्हणून आणि 'ये नुम्बेर मजदूद नाही है' असे नकळत विनोद करून, आपल्या नातवंडांच्या मनात घर करून 'पॉपुलर' आजी होऊ शकते.
माझीही इच्छा आहे अशी आजी बनायची, जिला नातवंड हक्काने विचारू शकतात 'आजी, माझं गिफ्ट कुठे आहे, जिच्या attention साठी ते भांडू शकतात, जिच्याकडे दर सुट्टीत त्यांना यायचं असत आणि जी आपल्या घरी गेल्यावर तिला ते शोधतात.
आणि म्हणूनच जेव्हा माझं भाऊ मला म्हणाला 'तू निघताना तू व आपल्या नाती कसे रडता ते मला बघायचं आहे', तेव्हा मी त्याल एवढाच म्हंटल, 'अरे, अस निरागस प्रेम मिळायला देखील नशीब लागतं.
No comments:
Post a Comment