अमू नेहमीसारखाच ट्राफिक मधून भरधाव वेगाने गाडी चालवून rally मध्ये असल्याचा जणू आनंद घेत होता व काही करायला नसल्यामुळे मी ट्राफिककडे अलिप्त पाने बघत विचारात बुडून गेले होते. नाहीतरी मला सवयच होती माझ्या आवडत्या विषयात हरवून जायची: मनुष्य स्वभाव आणि नाती. हा विषय असा होता कि कधीही, केवढेही, कोणीही त्याच्यावर विचार करू शकत होतं......उत्तरं.....ती तर मिळणं केवळ अशक्य होतं.
हल्ली नेहमीच विचार करताना एक विचार्धारिणी मला सतवायची....नाती कश्या वरून ठरतात आणि ती बदलत जातात ह्याची कल्पना असली तरीही आपण त्यात का गुंतत जातो.....हळू हळू माझ्या लक्ष्यात आलं होतं कि हे एक न बदलणारं सत्य आहे व त्या मुले त्या क्षणांचा आनंद घेणं हे केवळ शहाणपणाचं लक्षण असतं.
आणि एक असं निरागस आणि सुंदर नातं होतं ते अमू (मैथिलीच्या आईचा मानलेला भाऊ) व मैथिलीच. ते एकामेकान बरोबर इतके परिपूर्ण वाटायचे कि बघणारा देखील स्वतःला त्या नात्यात हरवून जायचा. खरं तर मामा भाची हे एक गाज्लेलच नातं होतं....मामाच्या गावाला जाऊया ह्या गाण्यापासून बर्याच टिपण्या त्यावर झाल्या होत्या अ त्या गाज्ल्यादेखील होत्या. मामा हा भाचीला चीडव्णारच व ती त्याच्याकडे हक्काने हट्ट करू शकणारच हे जणू त्या नात्यात अध्यारुतच होते, पण ह्या दोघांच काही तरी वेगळंच होतं......
'बाबा' ने सुरु करणारी मैथिली आता बर्याच काळा पासून त्याला मामा म्हणू लागली होती. आता तो माखता तिच्या लहान बहिणी (गार्गी) ने उचलला होता, पण अजूनही कधीतरी खेळात गुंग असताना तिच्या तोंडून 'बाबा' ऐकू यायचं आणि तो हि तीत्याच सहजपणे तिला उत्तर द्यायचा.
मी त्याच्याकडे अचानकच वळून म्हंटल अरे मैथिलीला खात्री पटत चालली आहे तुला काही येत नाही ह्याची. बर्याच काळा पासून ते दोघं दोन खेळात पार रंगून जायचे. तासंतास त्यांचा तो खेळ बघून मला देखील मजा वाटायची. मैथिलीला lipstick ला listip म्हणायची सवय होती. तो उच्चार तिच्या तोंडून इतका गोड वाटायचा कि आम्ही कारण शोधून तिला तो शब्द म्हणायला लावायचो. पण अमुचा त्यावरचा तोडगा सोपा होता तिने लीस्तीप म्हणताच तो त्याचा अजून अपभ्रौंश करायचा....कधी plastic तर कधी lispit ..... आणि हे उच्चार दर वेळेस बदलत रहायचे, स्वतः तो शब्द बोबडा बोलणारी मैथिली exasperate व्हायची, तिच्या चेहऱ्यावरचे बदलायचे व ती त्याला समजवायचा प्रयत्न करायची, 'अरे मामा lispit नाही listip ...... आणि परत एक चिकीचा उच्चार....
मैथिलेने ठरवल होतं कि मलाच तिची व्यथा समजू शकेल. लगेच ती माझ्याकडे वळून म्हणायची, 'बघ न ग आजी, तो listip ला lispit म्हणतोय...असा खेळ ते दोघं तासंतास खेळायचे. मैथिली मला एक समदुखी समजून तो काय म्हणतो आहे ते जणू माझ्या कानात पडलं नाही आहे तसं तो repeat करायची आणि बघता बघता ट्राफिक मध्ये आपण अडकलो आहे हे न कळता आम्ही केव्हाच घरी पोहोचायचो.
हे चालू असतानाच शाळेत मिठीच्या टिचरने एक नवीन गाणं शिकवलं....'एवढीशी कोथांबीर मिरची आलं, त्या तिघांचं भांडण झालं'. आता ती ते अमू मामा ला गाडीत शिकवू लागली होती. तोही तेवढ्याच उत्साहाने ते शिकायचा व तिच्या पाठोपाठ म्हणायचा...'एवढीशी कोथांबीर मिरची आलं, त्या चौघांचं भांडण झालं'......परत त्या चिमुकल्या जीवाचा तेवढाच त्रागा....'अरे नाही रे मामा, चौघं नाही तिघं...चौघं कसं होणार?'...आणि त्याचं प्रोम्प्त उत्तर 'बघ 'एवढीशी', 'कोथांबीर', 'मिरची', 'आलं', चार झाले कि नाहीत?'
परत चेहऱ्यावर तोच प्रश्न व त्याला उत्तर, 'अरे मामा एवढीशी म्हणजे काहीच नसतं' व एखाद्या umpire सारखं माझाकडे appeal .... 'हो कि नाही ग आजी, एवढीशी म्हणजे काहीच नसतं ना?' आणि माझा केवळ हसू त्यांचा तो खेळ आणि त्यात रमण बघून.
गाडी आता अमुने स्लो केली होती आणि आम्ही दोघ तय आठवणीत बुडून हसत होतो....परत मी म्हणाले, 'अरे मैथिलीला वाटत तुला काहीच येत नाही', आणि तो एक ऑटो journalist तेवढ्याच सहजपणे मला म्हणाला हो ना तिला वाटत मी शाळेतहि गेलो नाही.....नुसत्या म्हशी हाकल्या आहेत लहानपणापासून.' त्याचे डोळे लुकलुकत होते आणि त्या त्याच्या आनंदात मला लक्ष्यात आलं, माझे विचार केवढे उच्छृंखल होते ते मला नेहमी वाटायचा ......तिला काय वाटेल आपला मामा केवढा बुद्धू आहे .....आणि तिला तसं वाटता नये .......मी अडकले होते समाजाने बंधेलेल्या चक्रात ..... कि दुसऱ्याला आपल्याबद्दल चांगलंच वाटलं पाहिजे नाहीतर आपलं त्यांच्या मनात impression काय होईल.
त्या दोघांनी मुक्त केलं होतं मला ह्या चक्रातून आणि शिकवलं होतं मला खरं प्रेम म्हणजे मजा करणं असतं, सहवासाचा आनंद घेणं असतं, सहवासाचा आनंद घेणं असतं ....... त्यातून पुढे काय होईल?.....काय फरक पडतो त्याने. शेवटी काय, हातात असलेले क्षणच महत्वाचा असतो.
Very nice one. Interesting that you posted in Marathi
ReplyDelete