तो चंद्र काही बदलेला नाही
पण त्याचा प्रकाश मात्र बदलला आहे
मायेने कुर्वळणारा त्याचा सहवास
आज एक भकास उजेड बनून उरला आहे
तो उत्साह तो आनंद
तो सगळा आज मवळला आहे
आणि तो चंद्र केवळ
एक प्रतिमा होऊन राहिला आहे
केवळ तू नाहीस म्हणून
अर्थ सगळा संपला आहे
आणि डोळ्यातला अश्रू देखील
डोळ्यातच थीजला आहे
तुझ्या नसण्याचा आभास
क्षणा क्षणावर ठसला आहे
पण तरीही तुझा सहवास
पादो पदी वसला आहे
ह्या दुविधा मनस्थितित
जिव पार अडकला आहे
तुझ्या नसण्याचा अर्थ
आज मला उमजला आहे
No comments:
Post a Comment