कधी कधी वाटतं कि
अखंड आयुषच निघून गेलं आहे तुझ्यापायी
आणि तरीही तू कोण आहेस
हे देखील मला कळत नाही
बदलती रूपं घेऊन तू
मला नडत असतोस
आयुष्याच्या प्रत्येक क्षणात
तूच तू दडत असतोस
माझे आचार माझे विचार
माझे कधीच वाटत नाहीत
प्रत्येक क्षणावर आयुष्याच्या
विविध आभास उमटत रहित
तरी सुद्धा सारे म्हणतात
हि ती अशीच आहे
त्यांची ठाम मत पाहून
मन ते उमजू पाहे
त्यांना हे कसं वाटतं
मला कधीच समजत नाही
माझ्यातला मी पणा
मला अजिबात उमजत नाही
राग, लोभ, प्रेम, इच्छा
सगळ्यात तुझा हात दिसतो
ऑफिसच
असो वा घरचं काही
सगळ्यावर तुझा ठसा असतो
सुखं दुखं दोन्हीचे क्षण
मला तुझ्या दारी नेतात
आठवणींचे श्वास मनात
नकळत फुलात जातात
तुला मात्र हे सत्य
अजिबात रुजत नाही
शब्दात मांडून पहिले जरी
तुला ते समजत नाही
म्हणून आज मी केवळ
माझ्यासाठी जगणार आहे
कवितेत रंग सारे
माझ्यासाठी भरणार आहे
हि एक कविता मी
माझ्यासाठी लिहिणार आहे
माझेपण सापडे पर्यंत
मी ते शोधणार आहे
कविता असली माझी जरी
तुला पाहिजे तर दाद दे
समजण्याचा प्रयत्न सोडून
न समजता साथ दे
No comments:
Post a Comment