एक सहवास सोडून तू बघता बघता नाहीशी झालीस
एक दरवळणारा सुवास सोडून तू एकांतात विलीन झालीस
तरी मन मानत नाही कि तू इथे नाहीस
आयुष्याच्या प्रत्येक क्षणात तुझे आभास उमटत रहित
आज पाठीवर हात नसला तरी तुझा भास आहे
तुझ्या अजामर शिकवणीचा, न सुटणारा साथ आहे
तरी एकदा कधी तरी मधूनच एक हाक दे
आनंद आणि दुखांच्या क्षणी, पाठीवर एक थाप दे
तुझ्या गोड आठवणीनी आयुष्याला वाट दे
जाईन इथून तेव्हा पुन्हा तुझा सांभाळणारा हात दे
No comments:
Post a Comment